पार्थ पवारांच्या निकटवर्तीयाचा संशयास्पद मृत्यू, बॉडी बंद कारमध्ये आढळली, घटनेने सगळेच हादरले…


सोलापूर : येथील अजित पवार गटाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२ रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) या युवा नेत्याचा मृतदेह बंद कार मध्ये आढळून आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. रात्री घरासमोरील कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे.

राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने आत्महत्या का केली याचा तपास सोलापूर पोलिस करत आहे. याबाबत माहिती अशी की, ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. अनेक दिवसांपासून तो राजकारणात सक्रिय आहे.

त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे. या घटनेमागे काही घातपात आहे का? याचा तपास सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सोलापुरातील युवा नेता ओंकार हजारे रविवारी दुपारी कारमध्ये बसला होता.

त्यानंतर तो बाहेरच आला नाही. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तो सीटवर निपचित पडला होता. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढले गेले. त्याला ताबडतोब ओंकारला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी ओंकार हजारेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, राजकीय हेतून किंवा इतर काही कारणाने त्याने हे पाऊल उचलले का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. सध्या पोलीस त्याचे जवळचे लोकं आणि कुटूंबाकडून माहीती घेत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने मात्र सर्वांना एकच धक्का बसला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!