पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून, रोज भेटणाऱ्या पंडितने आवळला गळा, घटनेने खळबळ..


पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी दररोज बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच ही हत्या केल्याचं समोर आले आहे.

हत्येची ही घटना उघडकीस येता परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.

नितीन चंद्रकांत पंडित असं अटक केलेल्या ५१ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आहे. तर श्यामली असं हत्या झालेल्या ४० वर्षीय महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ती धायरी परिसरातील रायकर मळा परिसरात वास्तव्याला होती. तिची शनिवारी आरोपीनं ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. उधार दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातंय.

मयत श्यामली आणि आरोपी नितीन यांची पूर्वीपासून ओळख आहे. श्यामली दररोज रात्री पुण्यातील बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करायला जात होती. यावेळी आरोपी नितीन हा श्यामलीला बुधवार पेठेत सोडण्याचं आणि तिला परत आणण्याचं काम करत होता. यातून दोघांची मैत्री झाली होती.

याच ओळखीतून श्यामलीने नितीनकडून ४० ते ५० हजार रुपये उसणे घेतले होते. पण वारंवार पैसे मागूनही श्यामली पैसे परत देत नव्हती. यामुळे घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर नितीनने श्यामलीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!