माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवायची की नाही? उद्या शरद पवार घेणार बैठक, बैठकीकडे सर्वांचे लक्ष…


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सध्याउपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी चंद्रराव तावरे यांनी प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीसाठी 593 उमेदवारी अर्ज झाले आहेत. अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत 12 जून आहे.

सध्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने घोंगडी बैठकांना सुरुवात झाली आहे. असे असताना आता उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. यामुळे शरद पवार देखील आपले उमेदवार देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने माघार घेतली होती.

कारखाना अडचणीत असताना उमेदवार देणे आवश्यक नसल्याचे कारण त्यांनी दिले होते. आता मात्र माळेगाव कारखाण्याची निवडणूक आहे. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाने त्या निवडणुकीत शरद पवार गटाची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या प्रमुख पदाधिकारी उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता गोविंदबाग या ठिकाणी शरद पवार यांना भेटणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यावेळी युगेंद्र पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे बळीराजा सरकार बचाव पॅनलचे उमेदवार, कार्यकर्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!