बायको आणि मुलगी गावाला, भर दुपारी पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल, पुण्यात शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये खळबळ…

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शिवाजीनगर पोलीस लाईन मध्ये राहणारे आणि खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांची कोंढवा येथे बदली झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा सुरू आहे. सचिन हरीश्चंद्र सुर्वे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नावं राहत्या घरी ही घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनाही या घटनेने धक्का बसला आहे. सचिन सुर्वे हे शिवाजीनगर येथे पोलीस वसाहतीतील नवीन बिल्डिंग येथे राहत होता. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
सध्या तरी पोलिसांनी याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. सचिन सुर्वे यांच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सध्या चौकशी सुरू केली आहे. त्यांचे जवळचे मित्र तसेच कुटूंबाची चौकशी सुरू आहे.
तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तणावाबाबतही चौकशी सुरू आहे. त्यांनी सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सुर्वे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.