निष्पाप शिक्षकाची हत्या, रोहित पवारांकडून मिळाला आधार, मुलीची जबाबदारी घेतली, ती आता बनली शारदानगर संस्थेची सदस्य, नेमकं काय घडलं?


लातूर : काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील बडूर (ता.निलंगा) येथील निष्पाप शिक्षक गुरलिंग हासुरे यांची हत्या करण्यात आली होती. संपूर्ण गावात त्यांच्या हत्येनंतर एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच त्या हत्येच्या निषेधार्थ बडूर येथील ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्यात यावी त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, कुटुंबीयास शासकीय मदत मिळावी, त्यांच्या लहान तीन मुलींच्या भवितव्याचा शासनाकडून विचार व्हावा, त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी या मागणीसाठी संपूर्ण गावाने आंदोलन सुरू केले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी भेट देऊन दिवंगत गुरूलिंग हासुरे यांच्या घरी भेट दिली असता हासुरे यांची कौटुंबिक परिस्थिती पाहिली.

त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी व लहान तीन मुली, घरची परिस्थितीही हालाखीची पाहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांना फोन केला व मयत गुरूलिंग हासुरे यांची कहाणी सांगितली व या कुटुंबाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली असता आमदार रोहित पवार यांनी हासुरे यांची एक मुलगी दत्तक घेऊन इथून पुढची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, त्यानुसार मयत गुरूलिंग हासुरे यांची मुलगी व हासुरे कुटुंबिय ३१ मे रोजी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन मध्ये पोहोचले. या ठिकाणी अपूर्वा हिला प्रवेश देण्यात आला. यानंतर अपूर्वा व तिचे कुटुंबीय संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांना भेटल्यानंतर ही मुलगी आता या परिवाराची सदस्य असेल असे सुनंदा पवार यांनी सांगितले तेव्हा कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले.

यावेळी गुरुलिंग हासूरे यांच्या पत्नी संगीता हासूरे, काका गुंडाप्पा हासूरे, भाऊ सिद्धु हासूरे, कन्या अपूर्वा तसेच लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी संजय शेटे, फारुख शेख, महादेव आवाळे व अय्युब शेख आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!