माझ्यासोबत लॉजवर चल नाहीतर…,पुण्यात धमकी देत ३७ वर्षीय महिलेचे काढले व्हिडीओ अन्…,घटनेने खळबळ

पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका ४० वर्षीय नराधमाने ३७ वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपीने अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी गेल्या दोन-तीन महिन्यापासून पीडितेला वारंवार त्रास देत होता. तसेच लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. एवढच नाही तर आरोपीने पीडितेला एक दिवस धमकी दिली की, तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझ्या ऑफिसला येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करेल… या धमकीने पीडिता घाबरली.
धमकीने घाबरल्यानंतरी पीडिता आरोपीच्या गाडीत बसून लॉजवर गेली. लॉजवर गेल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. फोटो आणि व्हिडीओ दाखवत महिलेला ब्लॅकमेल केलं. माझ्याशी लग्न कर नाही तर नग्न फोटो वडिलांना हे सगळं पाठवेल.
दरम्यान, नराधमाचा त्रास असह्य झाल्यानंतर अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार केली . बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.