धक्कादायक! मेहुनीशी लग्न करण्यासाठी गरोदर बायकोला संपवलं, घटनेने सगळेच सुन्न…

उत्तर प्रदेश : तिसरं लग्न करण्यासाठी उतावळा झालेल्या नवऱ्याने ६ महिन्यांच्या गरोदर बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना उत्तर प्रदेशच्या एटामध्ये घडली आहे.
एका दारू कंत्राटदाराने आपल्या गर्भवती बायकोची गळा दाबून हत्या केली. शनिवारी रात्री या महिलेचा मृतदेह बेडवर आढळून आला. या घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य शेजारच्यांच्या घरी पार्टीला गेले होते. ही धक्कादायक जैथरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नगला डांडे गावात घटना घडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जैथरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फील्ड युनिट्स आणि श्वान पथकांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
मृत महिलेच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मृत महिला ६ महिन्यांची गरोदर होती. तिचे २०२० मध्ये आरोपी उपेंद्रशी लग्न झाले होते.
लग्नापासूनच आरोपी बायकोला मारहाण करत होता आणि तिचा छळ करत होता. या त्रासाला कंटाळून ती काही दिवसांपूर्वी फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहल्ला चौहट्टा येथील तिच्या माहेरी गेली होती. पण आरोपीने बायकोला परत सासरच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याने तिची हत्या केली. महिलेच्या मानेवर आणि पाठीवर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे हत्येपूर्वी तिला मारहाण केल्याचे देखील बोलले जात आहे.
आरोपी उपेंद्रच्या पहिल्या बायकोचा देखील असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर त्याने बायकोच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न केले. पण त्याने तिचा देखील छळ करून तिची हत्या केली. आरोपी उपेंद्रला बायकोच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने आपल्या बायकोची गळा दाबून हत्या केली.