सूरज चव्हाणचा चाहत्यांना ‘गुलिगत धोका’!! थेट साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल, लग्न जमलं?


पुणे : बिग बॉस’मराठी पर्वाच्या विजेता सूरज चव्हाण आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण चर्चेत आला आहे, त्यानं शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. व्हिडीओवरुन सूरजला त्याच्या स्वप्नातली परी मिळाल्याचं दिसतं आहे. त्यानं आपल्या होणाऱ्या बायकोची झलकही चाहत्यांना व्हिडीओतून दाखवली आहे.

व्हिडीओ पाहून चाहते खूश झाले आहेत. पण, व्हिडीओच्या शेवटी मात्र चाहत्यांना सूरजनं जोरदार धक्का दिला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरज मुलगी पाहायला जातो. सूरज मुलीच्या घरी जातो. त्याच्यासोबत त्याची बहीणसुद्धा आहे. मुलीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम होतो. मुलगी सूरजला पाणी घेऊन येते आणि दोघांची नजरानजर होते.

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. लगेचच दोघांचा साखरपुडा होतो. दोघेही एकमेकांना अंगठी घालतात. सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहते खूपच खूश झाले. पण, साखरपुड्यामुळे आनंदी झालेल्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही. व्हिडीओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं.

असे असताना मात्र, व्हिडीओच्या शेवटी सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडीओत दिसलं. सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. सूरजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणनं मराठी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती. सूरज चव्हाणनं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. महाराष्ट्रानं सूरजला उचलून धरलेलं. बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यावर त्याच मंचावर सूरजला सिनेमाची ऑफर मिळाली होती. तो आपल्या वेगळ्या अंदाजासाठी नेहेमी चर्चेत असतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!