देशवासियांना कसला आलाय ऑपरेशन सिंदूरचा अभिमान! उरुळीकांचन मध्ये किरकोळ कारणावरून लष्करी जवानाला पत्नी समोरच अज्ञातांकडून मारहाण…


उरुळी कांचन : ऑपरेशन सिंदूरने भारतीय लष्कराने देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. या शौर्याने लष्कराबद्दल प्रत्येक भारतीयांत अभिमान व्यक्त होत असताना उरुळीकांचन येथे मात्र किरकोळ कारणावरून दोन अज्ञात व्यक्तींकडून भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे . या मारहाणीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत असून जवानाला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

संतोष कृष्णा देशमुख (वय-43, रा. गडकरी वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या भारतीय लष्कराच्या जवानाचे नाव आहे. हि घटना आज शनिवारी (दि. 31) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे भारतीय लष्करात हवालदार या पदावर कार्यरत असून ते गुजरात येथील भूज बोर्डरवर देशसेवा करतात. सुट्टीनिमित्त ते उरुळी कांचन येथे राहत्या घरी आले आहेत. शनिवारी दुपारी गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी उरुळी कांचन गावातून पुणे -सोलापूर महामार्गावर आले होते.

पेट्रोल टाकून झाल्यानंतर गाडी घेऊन पत्नीसोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. सेवा रस्त्याने गाडी घेऊन घरी निघाले असताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या गेटसमोर आले. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीचा देशमुख यांच्या दुचाकीला धक्का लागला. धक्का लागल्याने देशमुख यांनी गाडी हळू चालवा व तुला दिसत नाही का असे म्हणाले.

यावेळी त्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या पत्नीसमोर अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण केली. यावेळी देशमुख यांनी मी ऑन ड्युटी आर्मी हवालदार आहे असे संगितले असता त्यांच्या अंगातील टी शर्ट फाडून त्या ठिकाणावरून पळून गेले. त्यामुळे या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत असून सिमेवर देशवासियांचे रक्षण करणाऱ्या जवानाला अशा पध्दतीने वागणूक मिळून अदखलपत्र गुन्हा दाखल झाल्याने त्या अज्ञात दोन व्यक्तींचा शोध घेऊन मोठी कारवाई होणार म्हणून नागरीकांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!