विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते गोवा विमान प्रवास झाला स्वस्त, आता ट्रेनच्या तिकीट दरात विमानाने करता येणार प्रवास..

पुणे : पुणे ते गोवा असा विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे ते गोवा असा विमान प्रवास काही एअरलाइन्स कंपनीकडून स्वस्त करण्यात आला आहे. आकासा एअर या एअरलाईन कंपनीकडून ग्राहकांना ट्रेनच्या तिकिट दरात विमान प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दरम्यान, अजूनही उन्हाळी सुट्ट्यांचा सिझन सुरूच असल्याने अनेक जण गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत आहे. पुण्यातूनही अनेक जण गोव्याला पिकनिक साठी जात आहेत. दरम्यान पुण्याहून गोव्याची ट्रिप आता खूपच स्वस्तात करता येणार आहे.
तसेच काही विमान कंपन्या पुणे ते गोवा फ्लाइट्स अवघ्या २३०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहेत. Akasa Air या विमान कंपनीकडून १ जुलै २०२५ रोजीची फ्लाइट फक्त २२३० रुपयांना उपलब्ध आहे.

म्हणजेच या एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने अवघ्या २२ ते ३० रुपयांमध्ये पुणे ते गोवा आणि गोवा ते पुणे हा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे ते गोवा असा प्रवास फर्स्ट क्लास एसीने करायचे असल्यास २३०० रुपयांचे तिकीट काढावे लागते.

महत्त्वाचे म्हणजे पुणे ते गोवा असा प्रवास जर ट्रेन नाही केला तर प्रवाशांना १२ ते १३ तास लागतात. यामुळे कमी पैशात आणि जलद गतीने प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी आकासा एअर या विमान कंपनीची फ्लाईट बेस्ट ऑप्शन राहणार आहे.