बारामतीत पतीने पत्नीवर धारदार शस्त्रानं डोक्यावर केले वार, उपचारादरम्यान मृत्यू, संशयाचे भूत ठरलं कारण…


बारामती : बारामतीतील बांदलवाडी येथील एकाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेचा ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मयत महिलेच्या बहिणीने बारामती पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी लहू रामा वायकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संजना लहू वायकर असं या मृत्यू झालेल्या चाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

लहू रामा वायकर (वय ४८ वर्ष, रा. बांदलवाडी, ता. बारामती, जि.पुणे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची फिर्याद मयत महिलेच्या बहिणीने बारामती पोलिसात दिली आहे. ही घटना (ता.२५)मे रोजी घडली आहे.

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (ता.२५) मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बांदलवाडी संजना लहु वायकर वय.४० वर्षे, रा. बांदलवाडी ता बारामती जि. पुणे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत पतीने धारधार शस्त्राने तिच्या डोक्यात, कपाळावर, तसेच तिच्या चेहऱ्यावर मारून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले.

दरम्यान जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीने संजना वायकरवरती केलेल्या हल्ल्यात संजनाच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. जखमी अवस्थेत संजनाला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!