धनंजय मुंडे गेल्या ८ दिवसांपासून गायब! हातातून मंत्रिपद गेल्यानंतर घेतला मोठा निर्णय..

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे या प्रकरणी मुंडे मोठ्या अडचणीत आले. याच काळात त्यांची पहिली पत्नी करुणा मुंडे यांनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले. कोर्टाने देखील यामुळे त्यांना दणका दिला.

बीडमधील गेल्या काही महिन्यांमध्ये वादामुळे चर्चेत राहिलेल्या धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. यानंतर मुंडेंच्या जागी आता मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून मुंडे हे गायब आहेत. ते नेमकं कुठं गेलेत याबाबत माहिती समोर येत नव्हती.
असे असताना आता याबाबत माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मन:शांती आणि ध्यानसाधनेसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यानसाधनेत मग्न झालेत. त्यांचे मंत्रपद भुजबळ यांना दिले असल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच मुंडे विपश्यनेसाठी गेल्याची चर्चा होत आहे. मनःशांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या ८ दिवसांपासून आहेत. दहा दिवसांच्या कोर्ससाठी धनंजय मुंडे इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
अनेक प्रकरणे बाहेर आल्याने मुंडे हे राजकीय मंचावर आले नाहीत. त्यांची आमदारकी देखील धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे यामुळे आता ते पुन्हा सक्रिय होणार की नाही हे लवकरच समजेल. मात्र या प्रकरणानंतर मुंडे मागे पडले आहेत. त्यांना आता राजकारणात पुढे यायला वेळ लागणार आहे.