बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या! माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या युगेंद्र पवारांनी बोलावला मेळावा, करणार मोठी घोषणा?


बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच आता शरद पवार गटाने देखील निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. उद्या त्यांनी मेळावा बोलावला आहे. यामुळे यामध्ये ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारखाना निवडणुकीसाठी ५०२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला होता. आता शरद पवार गट देखील तयारी करत आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुक शरदचंद्र पवार गटाने निवडणूक लढवली नव्हती. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार गट काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या ३० मे रोजी सायंकाळी ४ वाजता बारामतीतील कृष्णसागर हॉटेल येथे सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, सतीश खोमणे, राजेंद्र काटे, गणपतराव देवकाते यांनी केले आहे. इच्छुक उमेदवार उमेदवारांची चाचपणी करण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला आहे.

आता उद्याच्या मेळाव्यात युगेंद्र पवार आपल्या पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेत सर्व जागा जिंकल्या. यामध्ये शरद पवार गटाने आपले उमेदवार दिले नव्हते. कारखाना अडचणीत असल्याचे कारण त्यांनी दिले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!