तू खालच्या जातीची असल्याचे म्हणत फुरसुंगी येथे बॉयफ्रेण्डचा लग्नास नकार, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल…


उरुळी कांचन : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नासाठी तगादा लावताच संबंधित मुलाने जातीवाचक शिवीगाळ करुन तिला नाकारले. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

ही घटना फुरसुंगी परिसरात अडीच महिन्यांपूर्वी घडली होती झाली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी मंगळवारी (दि. २७) फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

पीडित आणि आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहेत., त्यांच्यात २०२० पासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. मागील काही महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपीकडे सतत लग्नाची मागणी करत होती. मात्र, आरोपीकडून सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.

वादाच्या वेळी आरोपीने पीडित मुलीला जातीवाचक शिवीगाळ केली. “तू खालच्या जातीची असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणत तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. यानंतर पुणे येथील मुलीने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने विशेष बाल न्यायालयात प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!