राजकारणात खळबळ! मनसे नेत्याला गांजा तस्करी प्रकरणी अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई…


मुंबई : भिवंडी शहरात एका धक्कादायक घटनेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षाला तब्बल तीन किलो ९६० ग्रॅम गांजा आणि रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

कुमार व्यंकटेश पुजारी (वय. ३४) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. भिवंडी गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भिवंडीतील कोंबडपाडा परिसरात काही व्यक्ती अवैध गांजा विक्री करत असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत सापळा रचण्याचे नियोजन केले.

कोंबडपाडा परिसरातील एका मोकळ्या मैदानात पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला आणि पुजारीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १ लाख २८ हजार रुपये असून, त्याच्याजवळ रोख रक्कमही मोठ्या प्रमाणात सापडली आहे. या गंभीर प्रकरणात, भिवंडी गुन्हे शाखेने पुजारी विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर त्याला भिवंडी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी आणि या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. जप्त करण्यात आलेला गांजा कुठून आला आणि तो कोणाला विकला जाणार होता, यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!