सांगलीत परिचारिकेवर बलात्कार! नराधम डॉक्टरच निघाला आरोपी, पोलिसांकडून अटक….

सांगली : सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी यास गोव्यात पोलिसांनी अटक केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत तपास सुरू आहे. डॉ. अरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी अरवट्टगी हे गोव्यात कांकोलीम येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनी गैरफायदा घेऊन हे गैरकृत्य केले आहे.
याबाबत माहिती अशी की, एक महिन्यापूर्वी डॉ. सुयोग यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्यांच्या निवासस्थानी नेले. यावेळी कोणीही नव्हते. यावेळी त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. त्यांनी आरडाओरडा केला मात्र डॉक्टरने गैरकृत्य केले.
यावेळी त्यांनी परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेने मोठा गोंधळ उडाला होता.
आता याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून डॉ. अरवट्टगी यांना अटक केली. तीन दिवस पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने डॉ. अरवट्टगी यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली असून याबाबत तपास सुरू आहे.