ऊसतोड कामगाराने लाखोंचा ऐवज लांबवला, न्हावरे येथील घटना…..

न्हावरे : येथील एका शेतकऱ्याच्या घरातून ऊसतोड मजुराने १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे याबाबत तपास करत आहेत. शिरूर पोलिसांनी ऊसतोड मजुराविरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबत आरोपीचा शोध घेतला जात आहे.
लखन अडागळे हा न्हावरे परिसरात ऊसतोड करण्याचे काम करत होता. तसेच मोहन सरके यांच्याशी ओळख असल्याचा फायदा घेऊन लखन अडागळे याने मोहन सरके यांच्या न्हावरे परिसरातील निंबाळकर वस्ती येथील घरात प्रवेश केला. तो एकटाच असल्याचे सांगितले जात आहे.
सरके यांच्या घरामध्ये अडकवलेली दुचाकीची चावी व घरातील कपाटातून दहा हजार रुपये चोरले. तसेच सरके यांची घराबाहेर उभी केलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची दुचाकी आणि घरातील कपाटातून चोरलेली १० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरला.
या प्रकरणी ऊसतोड कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत. आरोपी लखन अडागळे हा फरार आहे. लखन पांडुरंग अडागळे असे आरोपीचे नाव असून, मोहन निवृत्ती सरके यांनी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी न्हावरे परिसरात तांबेवस्ती येथील एका शेतकऱ्याच्या घरात घुसून ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलांनी सुमारे तीन लाख रुपयांची चोरी केली होती. ती घटना नुकतीच घडलेली असून, पुन्हा ऊसतोड कामगाराकडून चोरीची दुसरी घटना उघडकीस आली आहे.