मित्राची बंदूक हाताळताना गोळी सुटली; छातीत गोळी घुसल्याने एक जण गंभीर …


उरुळीकांचन : मित्राची बंदूक हाताळताना गोळीबार होऊन गोळी थेट स्वतःच्या छातीत घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोरटी (ता इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता.24) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुधीर रावसाहेब महाडिक (वय 49, सोरटी ता इंदापूर) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर महाडिक हे त्यांची मित्राची परवानाधारक बंदूक हाताळत होते. बंदूक हाताळताना बंदुकीतून अचानक गोळीबार झाला आणि बंदुकीतील गोळी थेट महाडिक यांच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली.

त्यानंतर त्यांना अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे विश्वराज हॉस्पिटलमध्ये रुग्णाची प्रकृती पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. पुढील कार्यवाही जिल्हा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

यावेळी बोलताना जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले की, मित्राची बंदूक हाताळताना महाडिक यांना स्वतः गोळी लागली आहे. त्यांना शस्त्रक्रियेसाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!