अजित पवार पुन्हा अडचणीत!! गोळीबार अन् महिलेची छेड काढल्याप्रकरणी दादांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल..

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते अनेक वेगवेगळ्या कारणाने अडकत आहेत. आता पुण्यातील इंदापूर शहरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी इंदापुरातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शैलेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत सध्या पोलीस तपास करत असून अजित पवार काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे आहे. महिलेची छेड काढल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शैलेश पवार याला जाब विचारण्यासाठी महिला केली होती. दरम्यान, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीवर गोळीबार केला.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधित महिलेने पुणे इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे इंदापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. इंदापूरमध्ये गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकार घडत आहेत. यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश पवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता त्यावेळी वर्तविली जात होती. दरम्यान, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस तपास करत असून अजित पवार यांनी याबाबत अजून काही प्रतिक्रिया दिली नसली तर ते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना पक्षातून काढण्याची मागणी केली जात आहे. यामुळे कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.