वैष्णवीचा मृतदेह पाहून मटनावर ताव मारला, सासरा हगवणे यांचा अजून एक क्रूरपणा समोर..

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात मोठा खळबळ उडाली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून १६ मे रोजी वैष्णवीनं जीवन संपवले. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सात दिवस फरार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना काल पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी स्वारगेट परिसरातून उचललं. वैष्णवीने आत्महत्या नाही तर दोन कोटीच्या हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप होता.
सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पण फरार असतानाही सुनेच्या मृत्यूच सासरा आणि दिरांना काहीही देणं घेणं नव्हतं. हे या व्हिडीओतून स्पष्ट झालं. फरार असताना आरोपी हगवणे पिता-पुत्र हॉटेलला मटणावर ताव मारत होते. तळेगाव दाभाडीतील पांढरा तांबडा रस्ता हॉटेलमध्ये मटण खातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं.

म्हणजेच पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बिना दिक्कत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फिरत होते. पण पोलिसांना कानोकान खबर लागली नाही. जेवण झाल्यानंतर आरामात हगवणे बाहेर पडला. काळ्या रंगाच्या थार गाडीत ऐटीत बसून पुढे आणखी फरार झाला.
लागली नाही. जेवण झाल्यानंतर आरामात हगवणे बाहेर पडला. काळ्या रंगाच्या थार गाडीत ऐटीत बसून पुढे आणखी फरार झाला.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या सहा सहा पथकाकडून हगवणेचा शोध सुरू होता. वैष्णवीचा आरोपी सासरा राजेंद्र हगवणे सात दिवस आधी पुण्याहून कोल्हापूर, कोल्हापूरहून पुन्हा पुण्यातील पावना डॅम, तळेगाव दाभाडे आणि स्वारगेट अशा ठिकाणी लपला. आलिशान गाड्या बदलत हगवणे पितापुत्र फरार होत राहिले. पण पहाटे साडेचार वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या मुसक्या आवळल्या आहेत.