ब्रेकिंग! जय भवानीमाता पॅनलची मोठी आघाडी! छत्रपतीचा पहिला कल आला समोर…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आता हाती येऊ लागला आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातून मोठ्या फरकाने पुढे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये 70 टक्के पृथ्वीराज जाचक यांचा पॅनल पुढे आहे, तर छत्रपती बचाव पॅनल 30 टक्के मतदान झाल्याचे बोलले जात आहे.

एकूण 9 हजार मतदानाची मोजणी झाली आहे. यामध्ये जय भवानीमाता पॅनलला 6 हजार पेक्षा जास्त मतदान असून छत्रपती बचावला 3 हजार मतदान झाले आहे. आता बारामती तालुक्यातील 38 पेट्यांची मतमोजणी सुरू झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
याबाबत अंतिम आकडेवारी लवकरच समोर येईल. सध्या इंदापूर तालुक्यातील माहिती समोर आली असून आता बारामती तालुक्यातील मतमोजणी सुरू आहे. यामुळे छत्रपती बचाव पॅनलला मोठा धक्का बसला आहे. निकालाचा कल हाती आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलची वाटचाल सुरू आहे. सुरुवातीपासूनच या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माजी चेअरमन अविनाश घोलप यांनी वेगळा पॅनल केल्याने ही निवडणूक झाली. अजित पवार आणि जाचक बापू एकत्र आल्याने करखाना निवडणूक एकतर्फी होईल, असे सांगितले जास आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्षेत्रात तळ ठोकून अनेक सभा घेतल्या. पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाला अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांनी देखील पाठिंबा दिला होता. यामुळे जाचक यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे.