छत्रपती कारखान्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष…


भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. याचा उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री दत्तामामा भरणे यांनी मतदान केले. सकाळपासून मतदानाकडे सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.

यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे सांगितले जात होते, मात्र माजी चेअरमन अविनाश घोलप यांनी तानाजी थोरात आणि मुरलीधर निंबाळकर यांच्यासोबत पॅनल तयार करून चुरस निर्माण केली. त्यांनी देखील जोरदार प्रचार केला.

इंदापूर आणि बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा साखर कारखाना असून या कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवणे अजित पवारांसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी अजित पवार कारखाना कार्यक्षेत्रात तळ ठोकून होते. यामुळे उद्या नेमका काय निकाल लागणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!