ब्रेकिंग! शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भीषण अपघात, दोघांचा मृत्यू….


शिरूर : येथील मांडवगण फराटा याठिकाणी भीषण अपघात झाला आहे. येथील कोळपेवस्तीत एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मांडवगण फराटा परिसरात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रोडवर कोळपेवस्ती येथील रोहीदास थोरात यांच्या घराजवळ ही घटना घडली. वेगाने डंपर चालवणाऱ्या डंपर चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला धडक दिली.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटनेचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत. यामध्ये सागर संभाजी कोळपे आणि यश सुधाकर भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अनिल बिरा कोळपे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

दरम्यान, डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत घटनेची फिर्याद दादा बाळासो कोळपे यांनी दिली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!