छत्रपतीसाठी अजित पवार हर्षवर्धन पाटील एकत्र!! म्हणाले, पृथ्वीराज जाचक यांच्या पाठीशीच उभे राहणार…


भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान होत आहे. यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सोबत मतदान केले. यावेळी त्यांनी कारखाना अडचणी असून एकत्र येण्याचे आवाहन केले.

सुरुवातीपासूनच छत्रपती कारखाना निवडणूक चर्चेत आहे. अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेत पॅनल केला. नंतर माजी चेअरमन अविनाश घोलप यांनी वेगळा पॅनल केला.

यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता, आता आज मतदान होत आहे. यासाठी आज दिग्गज नेते एकत्र आले. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कारखाना म्हणजे अनेकांचे संसार अवलंबून आहे. यासाठी याठिकाणी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे.

तसेच अजित पवार यांनी देखील सर्वांनी बाहेर पडत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आता उद्या निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावर इतर संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखाना हा एक महत्वाचा कारखाना असून यावर इंदापूर तसेच बारामतीचे राजकारण अवलंबून आहे. यामुळे अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी अनेक प्रचारसभा घेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या कारखाना अडचणीत आला असून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!