बारामतीत वकिलाचा कारनामा उघड! कोर्टाने चक्क वकिलाविरुद्धच फिर्याद दाखल करण्याचा दिला आदेश! नेमकं प्रकरण काय?

बारामती : बारामतीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी वकिलाने न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोर्टाच्या ताब्यात असलेल्या निशाणी नंबर दोन वर नाव लिहून केलेली सही उघडकीस आली, त्यावरून बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाल देशमुख यांनी वकील इन्कलाब शेख यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 379 ब व कलम 336 व 337 अंतर्गत फिर्याद दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. शेख हे बारामती वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. यामुळे आता याबाबत तपास केला जाणार आहे. चेक न वटल्याच्या प्रकरणात हा प्रकार उघडकीस आला.
हे प्रकरण सन 2021 मधील असल्याचे सांगितले जात आहे. न्यायाधीशाने वकिलाविरुद्धच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीचे वकिल शहानुर शेख यांनी फिर्यादीचे वकील इन्कलाब शेख त्यांची कृती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या खटल्यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय फिर्यादीच्या वकिलांनी सह्या केल्या हे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे धनादेश न वटल्याचा खटला बाजूलाच राहिला. फिर्यादीच्या वकिलांच्या इन्कलाब शेख यांच्या या कृतीमुळे गंभीर गुन्हा घडला असल्याची न्यायालयाचे मत झाले. फिर्यादीच्या वकिलांनी फिर्यादीचे वकीलपत्र सादर करताना स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या. नंतर आरोपीच्या वकिलांनी मुद्दा समोर आणला आणि फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या कागदपत्रावर पूर्व परवानगीशिवाय कागदपत्रावर सह्या केल्या.

न्यायालयाची फसवणूक करून व्यावसायिक गैरवर्तन केले हे दाखवून दिल्याने या कारणावरून न्यायालयाने वकिल इन्कलाब शेख यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे न्यायाधीशाने वकिलाविरुद्धच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरु आहे.