कोणी कोणाच्या नावावर कर्ज घेतले? न्यायालयाने कोणाला शिक्षा केली? सणसरच्या सभेत अजित पवार यांची विरोधकांवर जोरदार टीका…

भवानीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सणसर याठिकाणी काल सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. माजी चेअरमन आणि विरोधी पॅनलचे अविनाश घोलप यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली.

अजित पवार म्हणाले, सुरुवातीला कारखान्याचा चेअरमन व्हावं हे माझंही स्वप्न होतं पण मी उपमुख्यमंत्री झालो. अनेकदा चर्चा झाली शेवटी पृथ्वीराज बापू म्हणाले तुम्ही पॅनल करा मी उभा राहत नाही फक्त रोज आठ वाजता सकाळी कारखान्यावर जाऊन बसतो आणि कारखाना चालवतो परंतु पुन्हा मी पेट्रोल पंपावर बसलो. सगळे गरम डोक्याचे होतो त्याच्यामुळे मागे पुढे होत होतं शेवटी पॅनल तयार केला.
आज समोरच्या पॅनलचे त्यांचे वडील घोलप साहेब गेल्यानंतर त्यांची काय परिस्थिती आहे, सगळ्यांना माहित आहे. एका पिढीतच काय झालं पेपरला काय आलं, न्यायालयाने कोणाला शिक्षा केली, याबाबत सगळ्यांना माहिती आहे. जो स्वतः चांगला व्यवसाय करेल तोच कारखाना चालू शकतो.

इथे जाचक बाप्पू मामा मी आमचा उत्तम व्यवसाय आहे तिघांचे पेट्रोल पंप आहेत. काहीजण सांगत आहेत 2600 रुपये भाव दिला पण अकरा कोटी तोटा करून तो भाव दिला. कोणी सांगत आमची अमित शहा साहेबांशी ओळख आहे मी आता गेल्यावर त्यांना विचारणार आहे
आता डबा घेऊन कारखान्यात जावं लागेल बापूंच्या गोळ्यांमध्ये अजून एक गोळीचा समावेश होईल, अनेकांना दारूचे तंबाखूचं हुक्का याच व्यसन असतं तसं बापूंना कारखान्या चांगला चालवायचा व्यसन आहे. बापू म्हणाले मी कुठलीही निवडणूक लढणार नाही फक्त कारखाना बघेल. Ai चा वापर करा, चांगली शेती करा, असेही अजित पवार म्हणाले.