ताडोबाच्या जंगलात प्रेमयुद्ध पेटलं!! छोटा मटकाने प्रियसीसाठी घेतला 3 वाघांचा जीव, नेमकं काय घडलं?


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली. याठिकाणी प्रेमयुद्ध पेटल्याचं दिसून आलं. चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फाडशा पाडला. यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

छोटा मटकाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध अशा बजरंग आणि मोगली या दोन वाघांना टेरिटोरियल फाईट म्हणजेच अधिवासाच्या लढाईत ठार केले आहे. तर ताला, रुद्रा आणि बली या 3 वाघांना परास्त करून टेरिटरीच्या बाहेर हाकलून लावले आहे.

ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे. नयनतारा ही छोटा मटकाची प्रेयसी वाघीण आहे. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय. या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रम्हा याचाही समावेश आहे. प्रेयसीसाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांना संपवल्याची पहिलीच घटना आहे.

यापूर्वी त्याने ‘मोगली’ या वाघाला असेच ठार केले होते. तसेच ‘बजरंग’ वाघाला ठार करून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता ‘ब्रह्मा’ला ठार करून आपणच अनभिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले. ‘छोटा मटका’ने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचीही गय केलेली नाही. यामुळे याची चर्चा नेहेमी होत असते.

वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. मात्र या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून आला. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 6 महिलांचा गेल्या 5 दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वय वर्ष 6 इतके असलेल्या सीएमचा ताडोबाच्या रामदेगी या परिसरात अधिवास आहे. त्याने ब्रम्हा या अतिशय तरुण आणि धिप्पाड अशा वाघाचा अलीकडेच फडशा पाडल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लोकांवर देखील हल्ले वाढले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!