रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग, जाणून घ्या..

पुणे : पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या तसेच मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एक नवीन रेल्वे प्रकल्प लवकरच साकारला जाणार आहे.

या नवीन प्रकल्पांतर्गत कर्जत आणि पनवेलला जोडणारा चौथा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रकल्पाच्या संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, कर्जत आणि पनवेलला जोडणाऱ्या नवीन चौथ्या रेल्वे मार्गाच्या योजनेला मध्य रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या रेल्वे मार्गाची एकूण लांबी २९ किलोमीटर असणार आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यात थेट संपर्क साधण्यास मदत करेल.
या प्रकल्पाचा अंतिम तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) एप्रिल २०२३ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता, ज्याची किंमत ४९१ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कर्जत-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे हा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून विकसित केली जाणारी ही नवीन रेल्वे लाईन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर चालवण्यासाठी तीन लोकल ट्रेन देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा नवा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर त्वरित यावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या वर्षाच्या अखेरीस हा रेल्वे मार्ग तयार होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
