वडिलांचे अंत्यसंस्कार करून आला अन् वाटेल अपघात झाला, मुलाचा जागीच मृत्यू, घटनेने कुटूंब उध्वस्त…

करमाळा : येथील बेंगलोर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वडीलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधी उरकून परत येत असताना झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. हर्षद झंकार योगी असे त्याचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे

तसेच या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील वरकुटे जवळ पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. स्थानिकांनी तेथील मयत व जखमींना बाहेर काढून त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यामध्ये दोघा गंभीर जखमींना खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. इतरांवर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार चालू आहेत. गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बेंगलोर येथे रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या झंकर योगी यांचे अंत्यविधी उरकून परत गावी गुजरातकडे निघाले होते.

यावेळी कुर्डूवाडी वरून येत असताना वरकुटे नजीक कार आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली. यामध्ये योगी यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.