मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज!! देशात दारू होणार स्वस्त? महत्वाची माहिती आली समोर…

पुणे : मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे, ब्रिटिश बिअर आणि स्कॉच व्हिस्कीच्या किमतीत मोठी घट होणार आहे.

या करारानुसार, ब्रिटिश बिअरवरील आयात शुल्क तब्बल ७५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना आता ब्रिटिश बिअर पूर्वीपेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध होईल. पूर्वी भारतात आयात होणाऱ्या ब्रिटिश बिअरवर १५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जात होते.
मात्र, भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारानुसार हे शुल्क आता घटवून केवळ ७५ टक्के करण्यात आले आहे. या शुल्क कपातीचा थेट फायदा बिअर शौकिनांना मिळणार आहे, कारण त्यांना आता उच्च प्रतीची ब्रिटिश बिअर अधिक परवडणाऱ्या दरात चाखता येईल.

दरम्यान, या करारामुळे केवळ बिअरच नव्हे, तर इतर काही ब्रिटिश उत्पादनांवरील आयात शुल्कही कमी होणार आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत अधिक आंतरराष्ट्रीय पर्याय उपलब्ध होतील.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील हा मुक्त व्यापार करार ६ मे रोजी अंतिम झाला. या करारानुसार, ब्रिटिश वाइनवर मात्र भारताने कोणतीही शुल्क सवलत दिलेली नाही. बिअरवर मर्यादित आयात शुल्क लाभ देण्यात आले असले, तरी वाइनला यातून वगळण्यात आले आहे.
म्हणजेच, ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वाइनच्या शुल्कात कोणतीही कपात होणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपीय संघ वाइन क्षेत्रात एक मोठा आणि महत्त्वाचा जागतिक उत्पादक आहे.
जर ब्रिटनला वाइनवर आयात शुल्क सवलत दिली गेली असती, तर युरोपीय संघाकडूनही त्यांच्या वाइनवर शुल्क कपातीसाठी भारतावर दबाव वाढू शकला असता. त्यामुळे, वाइनला या सवलतीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.