शेतकऱ्याची कमाल, पिकवतो चक्क 3 किलोचा आंबा, नाव शरद मँगो, शरद पवारांशी कनेक्शन काय?

सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका बागेत तब्बल तीन किलोचा आंबा लागला आहे. माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी त्यांच्या बागेत आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करून तीन किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. यामुळे परिसरात याची चर्चा सुरु आहे. या आंब्याचे त्यांनी नाव ‘शरद मँगो’ असे ठेवले आहे.
याबाबत ते म्हणाले, तीन किलो आंबे पिकवण्यासाठी आम्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे कलम केले. यामध्ये केशर, केळी आंबा ( जो आंबा केळीसारखा दिसतो त्यामुळे त्यास केळी आंबा म्हटले जाते) आणि इतर विविध प्रयोगांचा समावेश आहे. पहिल्या बॅचमध्ये तीन किलो आंबे उत्पादन झाल्यामुळे बारामती कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांना माहिती देण्यात आली.
तसेच याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. फक्त शरद आंब्याला पेटंट मिळाले. आज हाच आंबा जगात चर्चेचा विषय ठरत आहे. दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या बागेत विविध प्रकारच्या आंब्यांचे कलम करण्याचे प्रयोग केले. या शेतीसाठी त्यांनी शरद पवार यांच्या माजी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झालेल्या फळ बाग योजनेची मदत घेतली.
शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांनी त्यांच्या बागेतील आंब्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावावरून नाव दिले आहे. या अनोख्या आंब्याला पेटंट देखील मिळाले आहे. विविध प्रकारच्या आंब्यांची कलमे केली गेली. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना फळ बाग योजना राबविण्यात आली होती. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
योजनेअंतर्गत आम्ही 8 एकर जमिनीवर सुमारे 10 हजार केशर आणि इतर आंब्याची रोपे लावली होती. त्यात त्यांनी बदल केले आणी एक नवीन आंबा प्रकार तयार झाला त्याला त्यांनी शरद मँगो असे नाव दिले. आता यातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.