पुण्यातील बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार!! तरुणी थेट पोलीस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी बांगलादेशी महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडून पुण्यात आलेल्या १६ वर्ष २ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच मैत्रिणीने फसवून पाच लाख रुपयांना बुधवार पेठेतील आक्काकडे विकले.
या मुलीवर पाच महिने खोलीत ठेवून शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला. अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत. यामुळे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत माहिती अशी की, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवण्यात आले. त्या बेकायदेशीरपणे भारतात आल्या. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवस राहिल्या. नंतर मात्र धक्कादायक प्रकार तिच्याबर घडला.
तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकले. तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील. या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात आलं. यामुळे तिला हा प्रकार करावा लागला.
दरम्यान, योग्य संधी मिळताच ७ एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे वर्ग केले. याबाबत तपास सुरू आहे.