वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश निर्गमित; २४ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत  मार्ग बंद…! 


पुणे : पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

 

नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!