धक्कादायक! तरुणाचे शीर धडावेगळे करून हातपाय तोडला, शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यात घटनेने खळबळ…

पुणे : पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडले. तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आढळून आल्याने शिरूर -श्रींगोदा तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी १८ ते २२ वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरी मध्ये आढळून आला आहे. या मृतदेहाचे शीर, दोन हात ,व एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळून आल्या आहे.

हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शिरूर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. जीवाचा थरकाप उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली आहे. मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय अद्याप सापडलेला नाही.

नक्की हा मृत्यू देह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी (ता .श्रीगोंदा )येथील माऊली सतिश गव्हाणे हा १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २५ पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले. याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
परंतु हा मृतदेह नक्की त्याचा का आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून, दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्याच मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला , डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.
दरम्यान, मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम आहे सुरू असून, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहे.