ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? गाडीवरून पळून जातानाचा व्हिडिओ आला समोर…

नाशिक : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी बक्षीलही जाहीर केलं आहे, मात्र तो अजून सापडला नाही. अशातच नाशिक येथे एका मंदिराजवळ कृ्ष्णा आंधळे याला दिसल्याचा दावा वकील गितेश तानाजीराव बनकर यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मी एक वकील असून गेल्या १८ वर्षांपासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करत असल्याने गुन्हेगाराला कस ओळखायचं हे मला चांगलं माहित असल्याचं वकील गितेश बनकर यांनी सांगितले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
याबाबत वकील म्हणाले की, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मी दत्त मंदिराजवळ आलो. तिथे एका झाडाजवळ मला दोघे दिसले. त्यातील एकाने मास्क खाली केल्यावर मला चेहरा दिसला. १०० टक्के सांगतो तो कृष्णा आंधळेच होता, मी लगेच गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये फोन करत माहिती दिली. दोघे त्यानंतर मखमलाबादच्या दिशेने गेला.

याबाबत चर्चा होण्याचे कारण म्हणजे, नाशिकमध्ये मागील महिन्यातही एका मंदिरात कृष्णा आंधळे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र ती अफवा असल्याचे समोर आले होते. आता बनकर यांनी आंधळे दिसल्याचा दावा केल्याने पोलिसांना कसून तपास करावा लागणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी त्याची हत्या झाली असल्याचे देखील सांगितले गेले होते.

याबाबत आता गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असून पळून गेलेला नेमका कोण होता? याचा शोध घेत आहेत. तो फरार असल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे.