लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये २१०० रुपयांची तरतूद नाहीच, आता देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले..


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

सरकारने विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर महायुती सरकार बहुमताने निवडून आले. त्यानंतर लाखो लाडक्या बहिणी सरकारकडून २१०० कधी मिळणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र त्यांची निराशा झाली आहे.

कारण सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

अजित पवारांनी आतापर्यंत ११ वेळ अर्थसंकल्प मांडला. १३ अर्थसंकल्पचा आतापर्यंत रिकॉर्ड आहे. तो दादा या टर्ममध्ये मोडतील.आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. २१०० देण्यावर आमचं काम सुरू आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचं आहे.

मागच्या ट्रेंडच्यानुसार पैसे देण्यात आले आहेत. वाटलं तर पैसे वाढवता येतील. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. आपण बॅलेन्स तयार करत, आपण आश्वासनं पूर्ण करु”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा १५०० रुपये मिळणार आहे. आम्ही घोषणा करू, पुढील महिन्यातून २१०० मिळणार. तसे मग देऊ. काही लपून घोषणा करणार नाही, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अजित पवारांनीही मी शब्दांचा पक्का आहे, बहिणींना नाराज करणार नाही, असे म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!