संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, मन सुन्न करणारी भयानक माहिती आली समोर….

बीड: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. तसेच हत्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या ज्या क्रूरतेने झाली, हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर तर संतापाची लाट उसळली आहे. जवळपास १५०० पानांच्या आरोपपत्रातील अनेक गोष्टी अजून समोर येणे बाकी आहे.
अशातच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. ज्यात संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने हालहाल करून मारले गेले याची कल्पना केली जाऊ शकते. देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीमुळे त्यांचं अंग काळे निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली होती.

संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालात काय आहे?
संतोष देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुणा
कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा
पोटावर मारहाण झाल्याने जखमा
नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले
छाती, गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमा
छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा
डाव्या खांद्यावर जखमा
दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला दुखापत
पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा
मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे-निळे पडले.
