लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?, मंत्री आदिती तटकरेंचं मोठे विधान…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या योजनेचा निधी १५०० वरुन २१०० रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिले होत. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नव्या सरकारचा कारभार सुरु झाला आहे. तसंच यावर्षीच्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहिरनामा हा ५ वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या २१०० रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणांनी २१०० रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.
आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च माहिन्याचा १५०० असा दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे ३००० रुपये महिला दिनापूर्वी मिळणार आहे.