मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? आमदाराच्या प्रश्नाने विधानसभेत वातावरण तापले, नेमकं घडलं काय?


मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या नावाने आता राजकीय वादळ उठले आहे. कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.

मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहे? हा प्रश्न भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित करताच सभागृहात वातावरण तापले आहे. विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत चर्चा सुरू असताना मुनगंटीवार यांनी प्रशासन आणि मंत्रिमंडळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही, हे दुर्लक्ष का? असा सवाल करत त्यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले, लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, याबाबत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रस्ताव पाठवला होता.

३७,९५८ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले आहे, पण प्रशासन म्हणते की पंचनाम्याचे आदेश दिलेच नाहीत! नियमांनुसार हे आदेश द्यायला हवे होते. मग मंत्रालयातील हे नवे ‘वाल्मिक कराड’ कोण आहेत? जे नियम मोडून निर्णय घेत आहेत? GR नुसार हा निर्णय मंत्रिमंडळात घेणे आवश्यक आहे. तो न घेता पंचनामेच झाले नाहीत, याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!