धनंजय मुंडे यांची हकालपट्टी, आता त्यांच्या जागी कोण होणार मंत्री? अजित पवारांकडून ‘हे’ नाव फिक्स?

मुंबई : आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता धनंजय मुंडेच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज होते. यामुळे त्यांची वर्णी लागू शकते.

याबाबत मंत्रिपद न मिळाल्याने अनेकदा छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून देखील दाखवली आहे. अशातच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे याबाबत निर्णय होऊ शकतो.
राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार? याची राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. याबाबत भुजबळ म्हणाले की, आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे. पक्षाची भूमिका हीच होती की, कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिशी घालणार नाही.

तसेच आमची भूमिका न्यायाचीच राहिल. कुठल्याही चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देणार नाही असेही ते म्हणाले. दरम्यान, सध्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. यामुळे कोण मंत्री होणार हे लवकरच समजेल. याबाबत अनेकजण इच्छुक आहेत.

दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा लागला. आज अधिवेशनात मोठा गोंधळ बघायला मिळाला. याबाबत धनंजय मुंडे यांनी अजून पुढे येऊन कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनी एक ट्विट केले आहे. आपण आजारी असल्याने राजीनामा देत असल्याचे मुंडे म्हणाले.