आमदारकीची कार्यकीर्द अवघी ३ महिने! आमदार ज्ञानेश्वर कटकेंचा ‘पीएमआरडीए’ निधी मंजुरी १ हजार ४२८ कोटी रुपये! वाहतुक कोंडी मुक्ती, दर्जेदार व प्रशस्त रस्ते टार्गेटवर ..


जयदिप जाधव

उरुळीकांचन : शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा तसेच वाढते शहरीकरण व वाहतुक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी पुणे क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून ११ व १२ व्या प्राधिकरणाच्या आमसभेत तब्बल विक्रमी १४२८ कोटींचा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.

‘पीएमआरडीए’ ची नुकतीच मुख्यमंत्री तथा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ व १२ वी आमसभा संपन्न झाली आहे. या आमसभेतून तरतूद झालेल्या शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून मतदारसंघाचा विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन पायाभूत सुविधेसह शहरीकरण व लोकसंख्येमुळे वाहतुक कोंडीसह भौतिक प्रश्न निर्माण होत असल्याने पायाभूत सुविधेची दर्जेदार उपलब्धी व वाहतुक कोंडीतून सुटका होण्यासाठी शिरुर- हवेली मतदारसंघात राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच मुख्य रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी व प्रशस्त रस्ते करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्य मातून प्रस्ताव देण्यात आले होते. या प्रस्तावावर अजित पवार यांनी शिरुर साठी ८५८.७६ कोटी तर हवेलीसाठी ५६९. ५९ कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे.

शिरुर -हवेली मतदारसंघात २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन आ.बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसह पुणे -नगर रस्त्यावरील बायपास मार्ग तयार करुन भरीव निधी मंजूर करण्यात आला होता. अशीच काही कामगिरी अवघ्या तीन महिने या भागाची सुत्रे स्विकारल्यानंतर आ. ज्ञानेश्वर कटके यांनी करुन दाखविली आहे. आ.कटकें यांनी पुणे- अहिल्यानगर मार्गावरील वाघोली ते शिरुर इलिव्हेटेड मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार त्यांनी वाघोली ते शिक्रापूर पर्यंत अनधिकृत बांधकामे काढली आहे. तर पुणे -सोलापूर महामार्गावर वाहतुकमुक्तीसाठी हडपसर ते उरुळीकांचन पर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई असे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रशस्त रस्ते, दर्जात्मक रस्ते व पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने वाहतुक कोंडीचा समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील मंजूर कामे ८५८.७६ कोटी रुपये :-

१) शिक्रापूर (ता. शिरूर) येथे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन केंद्र विकसित करणे १५ कोटी २) सणसवाडी ते पिंगळे जगताप रस्ता विकसित करणे ७९.०८ (भूसंपादन व विकसित करणे ) ३) शिरुर तालुक्यातील L & T फाटा पिंपळे जगताप ते करंदी फाटा रस्ता विकसित करणे. ११५ कोटी (भूसंपादन व विकसित करणे ) ४) आपटी ते सणसवाडी ते तळेगाव ढमढेरे इजिमा १४४ (प्रजिमा १६६) रस्ता करणे २५१.०९ कोटी (भूसंपादन व विकसित करणे ) २) कोंढापुरी ते तळेगाव ढमढे इजिमा १५४ रस्ता करणे १६२ कोटी ३) कासारी फाटा वाबळेवाडी जातेगाव ते रा.मा ५४८ (इजिमा १६० व इजिमा १५३) रस्ता करणे , ४) शिरुर तालुक्यातील रांजणगाव एम. आय.डी. सो परिसरातील पिंपरी दुमाला रामा १२८ ते ढोकसांगवी ते शिरुर ग्रामीण रा. मा.१०३ ला जोडणारा प्रजिमा ११५ रस्त्याचे सुधारणा करणे १५४.६९ कोटी. ५) ढोकसांगवी ते निमगाव भोगी ते मलठण रा. मा.१०३. ला जोडणारा प्रजिमा ११४ रस्त्याचे बांधकाम १८ कोटी. ६) अमदाबाद रा. मा. १०३ में निमगाव भोगी ते सोनेसांगवी रा.मा. १२८ इजिमा १४६ रस्त्याचे बांधकाम करणे. १८ कोटी ७) करडे ते निमोणे प्रजिमा ११४ रस्स्याचे बांधकाम करणे १२ कोटी . ८) श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ते निमगाव म्हाळुंगी रांजणगावच्या श्री महागणपती द्वारयात्रा (पालखी मार्गाची) १९ सुधारण करणे.८ कोटी . ९) श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ते ढोकसांगवी द्वारयात्रा (पालखी मार्ग) ग्रामीण मार्गाची मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ४ कोटी १०) मळाई देवी मंदी भांबडे येथे वाहन तळ, स्वच्छतागृह, सोलर व्यवस्था करणे. २ कोटी रुपये

हवेली तालुक्यातील ११ व १२ व्या सभेत मंजूर झालेली कामे ५६९.५९ कोटी रुपये :-

१) लोणीकंद सुरभी हॉटेल-भावडी-लोहगाव रस्ता करणे (पुणे मनपा हद्दीपर्यंत) (इजिमा १३८), – १७३.९२ कोटी रुपये

२) तुळापूर भावडी वाघेश्वर मंदिर पर्यंतचा रस्ता (इजिमा १२६), अंदाजीत किंमत – २२१.७० कोटी रुपये

३) आव्हाळवाडी फाटा ते मांजरी खु. मुळा मुठा नदीपर्यंतचा रस्ता करणे (प्रजिमा ५६) , अंदाजीत किंमत १४१.६० कोटी

४) थेऊर तारमळा पेठ उरुळी कांचन खामगाव टेक हिंगणगाव शिंदेवाडी रस्ता (प्रजिमा १३८) हिंगणगाव येथे मुळा मुठा नदीवर मोठा पूल बांधणे. ता. हवेली. १९ व्या प्राधिकरण सभेत मंजूर कामांची एकूण रक्कम रु. २९.३७ कोटी

५) श्री चिंतामणी गणपती मंदिर, थेऊर, ता. हवेली. अपेक्षित खर्च रु. कोटी- २.००

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!