मोठी बातमी! धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, विद्रोही साहित्य संमेलनात मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव…

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

यावेळी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण २९ ठराव घेण्यात आले. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. यामुळे आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का? हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र आता तरी त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, शहरातील आमखास मैदानावर सुरू झालेल्या या साहित्य संमेलनात परिसंवाद कवी संमेलने व्याख्यान गटचर्चा यांची रेलचल होती. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून तसेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू करण्याचे पडसादही विद्रोही साहित्य संमेलनात दिसले. यामुळे येणाऱ्या काळात यावरून वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

यात थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडण्यात आला. वाल्मिक कराड संबंधीत प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. यामुळे अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत राज्यात आंदोलने देखील करण्यात येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचे संबंध पुढे येत आहेत.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत त्यांनाच विचारा असं वक्तव्य केले होते. यामुळे येणाऱ्या काळात त्यांचा राजीनामा पुढे येऊ शकतो.