मोठी बातमी!! काम सुरू असताना बोगदा कोसळला, अनेक कामगार अडकले, बचावकार्य सुरू, घटनेने उडाली खळबळ…

नागरकुरनूल : तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली. येथे एका बोगद्याचा काही भाग कोसळल्याने सहा कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बचावकार्य सुरु आहे.

सध्या या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आली आहे. कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा आकडा ६ आहे की अजून जास्त आहे याबाबत माहिती समोर आली नाही, मात्र स्थानिकांनी हा आकडा ६ असल्याचे सांगितले. ही दुर्घटना तेलंगाणामधील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या बांधकाम सुरू असलेल्या भागात आज घडली.
या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिका-यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्याचे सिंचनमंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर अधिकारी विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

तेलंगाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेबाबत माहिती दिली आहे. येथे कालव्याच्या छताचा एक भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी कंपनीचे एक पथक बोगद्यामध्ये गेले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बोगद्यामध्ये ६ ते ८ कामगार अडकले आहेत.
