आता राज्य सरकारकडूनच मिळणार घरपोहोच वाळू ; महसूलमंत्र्यांचे संकेत…!

मुंबई : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महसूल खात्याच्याकडून आता वाळू घरपोहोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही, तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
राज्याच्या महसूल खात्याच्याकडून आता वाळू घरपोहोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही. तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
नगरमधील बहुप्रतीक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुईछत्तीशी येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती.