पाच कारखान्यांना 107 कोटी वाटपाचे आदेश! घोडगंगाचं काय झालं? उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय…

मुंबई : सध्या राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. आता राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या थकहमी पोटी रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राखून ठेवण्यात आलेली १०७ कोटी ६८ अखेर पाच सहकारी साखर कारखान्यांना देण्याचे आदेश सहकार सहकार विभागाने दिले आहेत.

यामुळे या कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये सध्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी प्रस्तावित मंजूर होणारी रक्कम १०७ कोटी ६९ लाख रुपये राखून ठेवावी. तसेच पाच कारखान्यांना मंजूर करण्यात आलेली ५९४ कोटी ७६ लाख रुपयांपैकी उर्वरित मंजूर रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले होते.
यामध्ये अशोक पवार यांच्या घोडगंगा कारखान्याबाबत आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिल्याने थकहमीचा मार्ग मोकळा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. एनसीडीसीच्या थकहमीसाठी पात्र असूनही आपल्याला डावलल्याने रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याबाबत आता निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या विरोधात विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंत नगर, सांगली, पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, वाळवे, अशोक सहकारी साखर कारखाना अशोक नगर, अहिल्यानगर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर या कारखान्यांनी याबाबत मागणी केली होती.
त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. असे असताना यामध्ये हंगाम वाया जाण्याची भीती असल्याने सरकारने सकारात्मक भूमिका घेत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला पुढील हंगामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आता याबाबत आठ दिवसात निर्णय होईल. यामुळे इतर कारखान्यांची राखून ठेवलेली १०७ कोटी ६९ लाख रुपयांची रक्कम देण्यास अडचण नसल्याचे न्यायालयासमोर वकिलांनी सांगितले.
याबाबत उच्च न्यायालयाने पाच सहकारी साखर कारखान्यांबाबात चार आठवडे तसेच रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.