पोरगी हुशार आहे, तिला पोलीस करतो, अकॅडमी दाखवतो, म्हणत केला बलात्कार, धमकावून गर्भपातही केला, खासदाराच्या शाळेतील भयंकर प्रकार


नांदेड : जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नंतर तिचा गर्भपात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलीस तपास सुरू आहे. राजुसिंह चौहान अस आरोपी शिक्षकाच नाव आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची हदगांव तालुक्यातील तामसा येथे ममाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेत हा प्रकार घडला आहे. यामुळे याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

या शाळेत एक विद्यार्थीनी दहावी वर्गात शिक्षण घेत होती. तुमची मुलगी हुशार आहे. तिला पोलीस अकॅडमीमध्ये भरती करतो, असं पालकांना सांगून अल्पवयीन मुलीवर हा मुख्याध्यापक बलात्कार करायचा. एकदा तिला पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवतो म्हणून त्याने चारचाकी वाहनातून नेले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर गाडीतच नको त्या गोष्टी केल्या, तसेच तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श केला.

अनेकदा या गोष्टी सुरूच होत्या. नंतर ती गरोदर राहिली. नंतर शिक्षकाने धमकी देत तिचा गर्भपात केला. हा प्रकार मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितला. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. याबाबत पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शिक्षक फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेचा सर्वत्र संतप्त व्यक्त केला जात आहे. घटनेच्या निषेधार्थ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तामसा शहर कडकडीत बंद पाळला. नागरिकांकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत त्याचा शोध घेतला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!