ड्युटीवरून घरी पोहचताच टोकाचं पाऊल उचललं, सोलापूरमध्ये पोलिसाच्या आत्महत्येने उडाली खळबळ..


सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पोलीस कॉन्स्टेबलनं स्वत:ला संपवलं आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ड्युटी संपवून घरी आल्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश ज्योतीराम पाडुळे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ते सोलापूर ग्रामीण मुख्यालयात सेवा बजावत होते

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाडुळे हे मुळचे माढा तालुक्यातील अंजनगावचे रहिवासी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली वैराग येथे झाली होती. ते कुटुंबासोबत तिथे राहायला गेले होते. अशात अचानक पाडुळे यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती वैराग पोलिसांना देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी महेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली? ते तणावात होते का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत.

दरम्यान , महेश पाडुळे यांनी वैराग येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं कशामुळे उचललं, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र त्यांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!