गंगा स्नान केल्यानंतर मोदींचे ट्विट चर्चेत!! देशवासीयांसाठी गंगामाताकडे मोठी मागणी करत म्हणाले, हर हर गंगे….


प्रयागराज : येथील महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होऊन त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. याचे फोटो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केले आहे. यावेळी लाखो लोकं उपस्थित होते. यावेळी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांनी आज मंत्रोच्चारात संगमात आस्थेची डुबकी घेतली. त्यानंतर त्यांनी गंगापूजन केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

ट्विट करत म्हणाले, आज महाकुंभात प्रयागराज येथील पवित्र संगमात स्नान केल्यानंतर मला पूजा करण्याचे परम भाग्य लाभले. मां गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले. यावेळी सर्व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. हर हर गंगे! अशी पोस्ट केली आहे.

तसेच प्रयागराजच्या दिव्य- भव्य महाकुंभात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम कोणालाही भारावून टाकणारा आहे, असे सांगत पीएम मोदी यांनी पवित्र कुंभमेळ्यातील स्नानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी पवित्र स्नान केल्यानंतर मंत्रांचा जपही केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी संगमात पवित्र स्नान करुन पूजा केली होती. दरम्यान, कुंभमेळ्यात जगभरातून अनेकजण उपस्थित राहत असून अजून काही दिवस हा मेला सुरूच राहणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!