बजेटआधीच मोठा धमाका!! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या….

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महागाई मुळे मोठी झळ बसत आहे. अशातच अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा देण्यात आला आहे. यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल. ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यात ही कपात पाहिली तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २० रुपयांपेक्षा जास्त कमी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ७ रुपयांनी कमी झाली असून आता किंमत १,७९७ रुपये असणार आहे. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच कोलकातामध्ये किमान ४ रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि किंमत १९०७ रुपये झाली आहे. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ६.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर २१.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

तसेच कोलकातामध्ये २० रुपयांची आणि चेन्नईमध्ये २१ रुपयांची घसरण दिसून आली आहे. मात्र सलग ११ व्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे घरगुती गॅसमध्ये काहीशी कपात करावी अशी मागणी केली जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल मार्च २०२४ मध्ये करण्यात आला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे. दुसरीकडे, कोलकातामध्ये किंमत ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे. यामुळे यामध्ये कपात करण्याची मागणी केली जात आहे.