पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!! पालिकेने घेतला मोठा निर्णय, नागरिकांनी व्यक्त केलं समाधान…

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. पुणे महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाने 20 फेब्रुवारीपूर्वी करवाढीबाबतचा निर्णय घेणे बंधनकारक आहे. महापालिकेने 2010-11 मध्ये मिळकतकरात 16 टक्के, 2013-14 मध्ये 6 टक्के आणि 2015-16 मध्ये 10 टक्के वाढ केली होती. त्यानंतर मिळकतकरात वाढ झालेली नाही. यामुळे यंदा याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
सध्याच्या महागाईने होरपळलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून पुणेकरांच्या मिळकतकरात वाढ झालेली नाही. मिळकत कर संकलन विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला. पुणे महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक आहे.

दरम्यान, पालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नाही. त्यामुळे करवाढ हा धोरणात्मक निर्णय असल्याने प्रशासकांकडून मिळकतकर आहे तसंच ठेवण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना महागाईच्या काळात मिळकतकरात वाढ न झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नवीन मिळकतींची कर आकारणी थकबाकी वसुली मिळकतींचा लिलाव या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.